Home नाशिक अक्राळे गावात कृषीदूतांचे आगमन

अक्राळे गावात कृषीदूतांचे आगमन

32
0

आशाताई बच्छाव

1001594286.jpg

अक्राळे गावात कृषीदूतांचे आगमन

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक तालुका प्रतिनिधी रामभाऊ आवारे

अक्राळे (ता.दिंडोरी) येथे क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालयाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत दाखल झाले आहेत.
अक्राळे ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये केदार धोपावकर, यश गाडे, अथर्व अस्वले, सिद्धांत अडसरे यांचा समावेश आहे. तीन महिने कालावधीत हे विद्यार्थी गावातील शेतकऱ्यांसोबत संपर्क साधून आपल्याकडील नवनवीन कल्पनांविषयी शेतकऱ्यांना जागरूक करतील. तसेच शेतकऱ्यांकडील शेतीतील नवीन प्रयोग स्वतः आत्मसात करतील. या प्रात्यक्षिक उपक्रमांमध्ये माती व पाणी परीक्षण, पिकांचे लागवड तंत्रज्ञान, पिकांवर येणारी कीड व रोग यांची माहिती व व्यवस्थापन, शेतीशी निगडीत विविध समस्यांचे निराकरण, बीजप्रक्रिया यांचा समावेश असेल. यावेळी सरपंच, ग्रामविकास अधिकारी ढेरींगे सर , ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. के.के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, सचिव के. एस. बंदी, समन्वयक वी. एम सेवलीकर तसेच प्राचार्य वी. एस. संधान, प्रा. पी. एस. बस्ते, प्रा. पी. एस. देवरे, प्रा. पी.एम. क्षीरसागर, प्रा. एन. एस.घोगरे, प्रा. वी. जे. बाजोडे, प्रा. डी. एस.गांगुर्डे यांचे विद्यार्थांना मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here