Home बुलढाणा खाऊ बोक्यांनी रस्त्यावरचे डांबर खाल्ले ! – हातानेच उकरल्या जाते -डांबर! –...

खाऊ बोक्यांनी रस्त्यावरचे डांबर खाल्ले ! – हातानेच उकरल्या जाते -डांबर! – रुईखेड टेकाळे ते वरवंड रस्त्याच्या गुणवत्तेवर ठेकेदाराचा वरवंटा ?

35
0

आशाताई बच्छाव

1001588748.jpg

खाऊ बोक्यांनी रस्त्यावरचे डांबर खाल्ले ! – हातानेच उकरल्या जाते -डांबर! – रुईखेड टेकाळे ते वरवंड रस्त्याच्या गुणवत्तेवर ठेकेदाराचा वरवंटा ?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा रस्ते विकाच्या वाहिन्या समजल्या जातात. मात्र प्रशासकीय यंत्रणेतील काही खाऊ अधिकारी व ठेकेदाराच्या संगणमताने काही रस्ते कामात प्रचंड भ्रष्टाचार होऊन रस्ते निकृष्ट दर्जाचे केले जातात. तालुक्यातील रुईखेड टेकाळे ते वरवंड हा रस्ता देखील निकृष्ट दर्जाचा असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला आहे. रस्त्यावर अल्प प्रमाणात टाकण्यात आलेले डांबर हाताने उकरल्या जात आहे. त्यामुळे हे डांबर कोणी खाल्ले? हा प्रश्न उपस्थित होत आहे.रुईखेड टेकाळे ते वरवंड रस्त्याचे काम सुरु आहे. हा मार्ग खामगाव ते शेगाव जाण्यासाठी सर्व प्रवाशांना सोयीचा व शॉर्टकट मार्ग आहे. शिवाय खामगाव बाजारपेठ ही शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. सदर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत 4 किलोमीटर पर्यंत सुरू असून, काम अतिशय निकृष्ट दर्जाचेहोत असल्याचा आरोप आहे. रस्त्याच्या दोन्ही साईड ला काळी माती, काही ठिकाणी अर्धवटच नाल्या
आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता सुद्धा रुईखेड टेकाळे येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली. रस्त्यावरील टाकलेले डांबरीकरणाचे मटेरियल एक इंच सुद्धा नसून ते हाताने उकरल्या जात असल्याचे गावकरी सांगतात.

त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकारी व ठेकेदारावर योग्य कारवाई करून या रस्त्याची पाहणी करावी व हा रस्ता चांगल्या दर्जेचा व्हावा तसेच रस्त्याच्या साईडने जी काळी माती टाकलेली आहे, त्यावर मुरूम टाकावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here