आशाताई बच्छाव
खडक माळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र मोफत आरोग्य तपासणी शिबिर
शिबिरात ५५३ नागरीकांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ—
रामभाऊ आवारे
निफाड (नाशिक) तालुका प्रतिनिधी रामभाऊ आवारे
के के वाघ शिक्षण संस्था के के वाघ फाउंडेशन बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाउंडेशन आणि स्माईल व स्पिनॅच यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कै.बाळासाहेब वाघ यांचे स्मृती प्रित्यर्थ शनिवार ७ जून 2025 रोजी मोफत नेत्र, हृदय व मेंदू विकार तसेच महिला आरोग्य तपासणी महाशिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र खडक माळेगाव, ता. निफाड येथे करण्यात आले.
सदर शिबिरामध्ये खडक माळेगाव, खानगाव, टाकळी, पिंपळद, हिरापूर व देवरगाव येथील ग्रामस्थांची व गरजूंची आरोग्य तपासणी करण्यात आली.आरोग्य तपासणीसाठी श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट नाशिक, मनीशंकर आय हॉस्पिटल नासिक व नामको हॉस्पिटल नासिक येथील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 553 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिर प्रसंगी के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी, निफाड पंचायत समिती मा सभापती श्री.शिवा पाटील सुरासे, श्री.इंद्रभान रायते, श्री.दत्ता काका रायते, श्री. दत्तात्रय डुकरे, श्री.रमाकांत जाधव, श्री. पोपटराव रायते इ मान्यवर उपस्थित होते.