Home महाराष्ट्र महावितरण सरळ सेवा भरती प्रक्रियेतील सहायक अभियंत्यांची प्रतीक्षा यादी लवकरच जाहीर होणार

महावितरण सरळ सेवा भरती प्रक्रियेतील सहायक अभियंत्यांची प्रतीक्षा यादी लवकरच जाहीर होणार

58
0

आशाताई बच्छाव

1001539417.jpg

महावितरण सरळ सेवा भरती प्रक्रियेतील
सहायक अभियंत्यांची प्रतीक्षा यादी लवकरच जाहीर होणार

अकोला/मुंबई, गोपाल तिवारी ब्युरो चीफ दि. २६ मे २०२५ –
महावितरणकडून सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे अभियांत्रिकी पदवीधारक (वितरण/स्थापत्य) ३४२ उमेदवारांची सहायक अभियंता पदासाठीची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. या निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणी दरम्यान अपात्र व गैरहजर तसेच नियुक्तीपत्रातील विहीत मुदतीमध्ये रुजू न झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणात महावितरण कंपनीच्या नियमाप्रमाणे प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार प्रतीक्षा यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रतीक्षा यादी प्रसिध्द करण्यात येईल.

महावितरणच्या जाहिरात क्र. ०७/२०२३ अन्वये अभियांत्रिकी पदवीधारक (वितरण-३०२ व स्थापत्य-४०) सहायक अभियंता पदाच्या ३४२ जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली आहे. त्याप्रमाणे दि. १४ जानेवारी २०२५ रोजी सहायक अभियंता पदासाठी निवड यादी जाहीर करण्यात आली.

*कनिष्ठ अभियंतापदी ९१ उमेदवारांना नियुक्तीपत्र*

कनिष्ठ अभियंतापदी अभियांत्रिकी पदविकाधारक ९१ उमेदवारांची (वितरण-६० व स्थापत्य-३१) निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार सरळ सेवा भरतीद्वारे ७२ तर अनुकंपा तत्त्वानुसार १९ उमेदवांराची निवड करण्यात आली आहे. अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून या उमेदवारांना परिमंडलस्तरावर नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. परिमंडलात रुजू होणाऱ्या संबंधित उमेदवारांना रिक्त जागी सविस्तर पदस्थापना देण्यात येत आहे.

Previous articleमंगरूळपीर खरेदी विक्री च्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या शेलुबाजार येथील नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्याचे अतोनात हाल
Next articleपवनी तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू, दोन जखमी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here