आशाताई बच्छाव
प्रहारचा “संताजी धनाजी” संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार २०२५ दिपक जाधव यांना प्रदान…..
वासखेडी/ साक्री संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ- येथील येथे प्रहार जनशक्ती पार्टी व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आयोजित संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा व विभागीय मेळावा नाशिक येथील रावसाहेब थोरात ऑडीटोरियम येथे राज्यमंत्री तथा दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आदरणीय बच्चुभाऊ कडु यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला…
याबाबत अधिक माहिती अशी की,२२में२०२५रोजी नाशिक येथील रावसाहेब थोरात ऑडीटोरियम येथे संताजी धनाजी पुरस्कार २०२५ व प्रहार संघटनेचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी धुळे जिल्ह्यातील एका साक्री तालुक्यातील माळमाथा परीसरातील वासखेडी या गावाचे ग्रामीण भागात सामाजिक कार्याचा ठसा उमटविणारे व सामाजिक कामात सतत कार्यतत्पर सामाजिक कार्य करणारे उपसरपंच तथा पत्रकार दिपकभाऊ जाधव यांना संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार २०२५ नाशिक विभागीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार ,दिव्यांगाचे दैवत राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चुभाऊ कडु यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रधान करण्यात आला,
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील असंख्य गोरगरीबांच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यरत असलेले भरीव योगदान आहे, यापुर्वीही त्यांना महीला शक्ती संघटनेचा करोना योध्दा पुरस्कार,कोल्हापुर येथे पत्रकार क्षेत्रातील लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२३,विश्वगामी पत्रकार संघाचा आदर्श समाजसेवा पुरस्कार, निसर्ग मित्र समितीचा स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५ आदी पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आले आहे, समाजातील विविध घटकांना न्याय हक्कासाठी सतत लढा देण्यासाठी कार्यतत्पर सामाजिक कार्याचा हाच मोठा सिंहांचा वाटा व कुटुंबियांची शिकवण हाच आदर्श समोर ठेवला आहे,
यावेळी निरिक्षक कुणाल राऊत,महेश बडे, जाधव मॅडम,अँड,कविता पवार,धुळे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब बोरसे,नाशिक प्रहार संघटनेचे ललित पवार,गणेश निंबाळकर,अनिल भडांगे साक्री तालुका प्रमुख जयेश बावा,संजय अहीरराव, नाना शेलार,प्रहार शेतकरी संघटनेचे गणेश राजपुत, योगेश जाधव, शशिकांत अहीरराव,प्रदीप सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते रोहीत कुवर आदी यावेळी उपस्थित होते,दिपक जाधव यांच्यावर. विविध स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे,






