आशाताई बच्छाव
देवळा प्रतिनिधी भिला आहेर:-
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी, शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि सीमेवर सेवा देणाऱ्या जवानांना पाठिंबा देण्यासाठी देवळा येथे मोठी तिरंगा रॅली काढण्यात आली.
ही रॅली शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सुरू झाली. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संपन्न झाली.
या रॅलीमध्ये म वि प्र चे माजी संचालक प्रमोद पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष किशोर आहेर,शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख देवानंद वाघ,मालेगाव शेतकी संघाचे मा.चेअरमन संदिप देवरे,देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संजय आहेर,माजी उपनगराध्यक्ष अशोक आहेर,जितेंद्र आहेर ,अतुल आहेर,देवळा तालुक्यातील वीर नारी श्रीमती आशा सोंनजे .
देवळा तालुका आजी-माजी सैनिक सामाजिक संस्था चे अध्यक्ष माजी सैनिक पंडित आहेर, जनसंपर्क अध्यक्ष माजी सैनिक प्रवीण बोरसे, खजिनदार कैलास पगार, सचिव भास्कर शिंदे, योगेश खैरनार, सुभाष वाघ, मांगू लोखंडे, अतुल सूर्यवंशी, राजाराम सोनवणे, थोरात संतोष, रमेश आहेर, रवींद्र पगार, योगेश बोरसे, केशव अहिरे, सचिन आहेर, तसेच तालुक्यातील असंख्य आजी माजी सैनिक बांधव तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक, शाळेचे विद्यार्थी,तरुण आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ही रॅली एकतेचा आणि देशप्रेमाचा संदेश देणारी होती. शहीद जवानांच्या बलिदानाला मान देत आणि सध्या देशासाठी लढणाऱ्या जवानांना पाठिंबा देणारी ही रॅली प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेम जागवत गेली