आशाताई बच्छाव
अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे –कोकण किनारपट्टीला शक्ती चक्रीवादळाचा धोका
राज्यात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याचे येत्या ३६ तासांत चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला शक्ती असे नाव देण्यात आले आहे. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून त्याचा फटका कोकणाला बसणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
कोकण किनारपट्टीवर ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील तसेच अतिवृष्टीचाही धोका आहे. त्यामुळे हवामान विभागाने कोकणातील दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबईसह उर्वरित कोकणाला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात मागील १५ दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. २० मे पासून या पावसाचा जोर वाढला आहे. आताही २७ मेपर्यंत राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.