आशाताई बच्छाव
चोरीचा धक्कादायक प्रकार ! मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावलं; शेगावात गौलखेड रोडवरील श्रीकृपा नगर येथील घटना !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- शेगाव श्रद्धेने मंदिरात दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या महिलेसोबत घडलेली घटना संपूर्ण शेगावात खळबळ माजवणारी ठरली आहे. गौलखेड रोडवरील श्रीकृपा ८
नगर भागात दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वनिता मोहन कलोरे (वय ५७, रा. श्रीकृपा नगर, गौलखेड रोड, शिवम बार मागे, शेगाव) या आपल्या सुनेसोबत सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन आटोपून गावातील प्रकाश पोटे यांच्या घराजवळून पायी जात असताना, अचानक समोरून एका दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर झडप घालून त्यांच्या गळ्यातील सुमारे २८ ग्रॅम वजनाचे, दोन सोन्याचे डोरले असलेले मंगळसूत्र (किंमत सुमारे ९५ हजार रुपये) हिसकावून नेले.