आशाताई बच्छाव
खळबळजनक ! पळून जाऊन लग्न केले; नंतर झाला दगा ! प्रेयसीची हत्या करून प्रियकरानेही घेतला गळफास ! खामगाव तालुका हादरला…तरुणी आवार गावची
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
छत्रपती संभाजीनगर बुलडाणा :-खामगाव प्रेयसीचा खून करून प्रियकारानेही तिच्याच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, २ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमधील साजापूर येथे उघडकीस आली. दोघांचेही मृतदेह पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. शिवानंद रमेश जाधव (२६, रा. अजिंठा ता. सिल्लोड ह.मु. साजापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे, तर वैष्णवी महादेव खराटे (२४, रा. आवार, ता. खामगाव, जि. बुलढाणा) असे खून केलेल्या प्रेयसीचे नाव आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियकर शिवानंद याचे तीन दिवसांपूर्वीच दुसरे लग्न झाले होते. याच कारणावरून दोघांत वाद झाल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला वैष्णवी खराटे ही मूळची खामगाव तालुक्यातील आवार येथील राहणारी आहे. ३ ते ४ वर्षापूर्वीच तिने प्रियकर शिवानंद सोबत पळून जावून लग्न केले होते. साजापूर येथील एसबीआय बँकेच्या पाठीमागे झरीना मुसा शेख यांच्या घरात ती राहात होती. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत ती काम करत होती. दरम्यान, चार ते पाच महिन्यांपूर्वी शिवानंद जाधव हा तेथे तिच्यासोबत राहण्यासाठी आला होता. शुक्रवार, २ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास नळाला पाणी आल्याने घरमालकाची मुलगी त्यांना सांगण्यासाठी गेली होती. बराचवेळ दरवाजा वाजवत होती. मात्र आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर घर मालकांनीही आवाज दिले. आवाज ऐकून शेजारील नागरिकही तेथे जमा झाल्याने काही दक्ष नागरिकांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती
झाल्याने काही दक्ष नागरिकांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सपोनि संजय गित्ते, पोउपनि प्रवीण पाथरकर, पोहेकॉ राम तांदळे, बाळासाहेब आंधळे, योगेश गोमलाडू, महेंद्र साळुंके, मंगेश मनोरेंसह टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, एक तरुण झाल्याने काही दक्ष नागरिकांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सपोनि संजय गित्ते, पोउपनि प्रवीण पाथरकर, पोहेकॉ राम तांदळे, बाळासाहेब आंधळे, योगेश गोमलाडू, महेंद्र साळुंके, मंगेश मनोरेंसह टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, एक तरुण साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्य अवस्थेत दिसला. तर एक तरूण तरूणी
जमिनीवर निपचित पडलेली होती. पोलिसांनी त्या दोघांना रुग्णवाहिकेतून घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्या दोघांना तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास। पोलीस अंमलदार मंगेश मनोरे करीत आहेत.