आशाताई बच्छाव
बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात 5 मे ला न सोडल्यास ६ मे पासून शेतकऱ्यांचा आंदोलन पेटणार
संजीव भांबोरे
भंडारा -तुमसर व मोहाडी तालुक्यात वरदान ठरणाऱ्या बावनथडी प्रकल्पाचे पाणी 5 मे 2025 ला नदीपात्रात न सोडल्यास 6 मे 2025 पासून तालुक्यातील शेतकऱ्यांची आंदोलन तीव्र रूप धारण करणार असल्याची माहिती देण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की,
तुमसर तालुक्यात उन्हाची दाहक वाढल्याने जलस्तर खोलात गेला आहे. तालुक्यातील विहरी, तलाव पूर्णतः आटले व बोरवेल सुद्धा बंद पडल्याने विशेषतः नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर तर आला आहेच त्याच बरोबर शेतकऱ्यांची उन्हाळी पीके मरणासन्न अवस्थेत आली आहेत परिणामी तात्काळ प्रभावाने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी प्रभावित झालेल्या शेतकरी व नागरिकांनी भंडारा व बालाघाट मध्य प्रदेशातील जिल्हाधिकारी यांच्या कडे केली होती. व आंदोलनाचा इशाराही दिला होता.
तुमसर ,मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे अशी ओळख निर्माण झालेल्या राजीव गांधी(बावनथडी) प्रकल्प हा बावनथडी नदीवर उभारण्यात आला त्यामुळे मध्यप्रदेशातून नदीवाटे येणारा पाणी राजीव गांधी प्रकल्पातच अडविले जात आहे परिणामी बावनथडी नदीत पाण्याचा ठण ठणात आहे त्यामुळे तालुक्यातील देवनारा, चिखली, डोंगरी बुज., रोहणीटोला, चांदमारा, लोभी, आष्टी, बावनथडी, पाथरी, कवलेवाडा, सकरघरा, घानोड, सोंडया वारपिंडकेपार, महालगाव या गावामध्ये भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्पातुन पाणी शेतकऱ्यांना मिळत नसेल व पाण्या अभावी शेतकऱ्यांचे उभे पीक मरत असतील तर त्या प्रकल्पाचा फायदा तरी काय असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
मध्यप्रदेश अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन अन्यथा धरणे आंदोलन
बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याचा अधिकार जिल्हाधिकारी बालाघाट (मध्यप्रदेश) यांच्याकडे असल्यामुळे जिल्हाधिकारी बालाघाट व उपविभागीय अधिकारी, कटंगी (मध्यप्रदेश) यांना निवेदन देऊन पाणी न सोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी कटंगी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक 2 मे ला घेण्यात आली. दरम्यान त्यांनी दिनांक 5 मे रोज सोमवारला पाणी सोडण्याचे आश्वासन दिले खरे. मात्र, जर पाणी सोडण्यात आले नाही, तर दिनांक 6 मे 2025 रोजी बैनकट्टा बॅरियर येथे धरना आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
आढावा बैठकीत
दि 2 मे रोजी झालेल्या आढावा बैठकीला श्री महाकाल बहु संस्था तुमसर चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता ठाकचंद मुंगूसमारे, ग्रामपंचायत आंजनविहिरी, मध्यप्रदेश चे सरपंच
दीपक पुष्पतोडे , उपसरपंच विजय राऊत , ग्राम पंचायत सदस्य संजय गौपाले , खेमचंद गौपाले (सामाजिक कार्यकर्ता), राजू पांडे (सामाजिक कार्यकर्ता), तसेच अनेक आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोट —
आतापर्यंत शेतकऱ्यांनी आपले पीक कसे बसे वाचविले मात्र समस्या बिकट झाल्याने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडण्या करिता लेखी पत्र दिले परंतु अद्याप पाणी सोडले गेले नाही परिणामी शेतकरी हवालदिल झाले आहे
ठाकचंद मुंगूसमारे
सामाजिक कार्यकर्ता