आशाताई बच्छाव
100 दिवसांचा कृती आराखडा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्वोत्तम कामगिरी; राज्यात पाचवा तर छत्रपती संभाजीनगर विभागात अव्वल क्रमांक
परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाचा राज्यात दुसरा क्रमांक
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार नांदेड, :- 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या पहिल्या टप्याचा निकाल काल जाहिर झाला. सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने 66.86 गुण मिळवून राज्यात पाचवा तर छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांक पटकाविला.
तर राज्यात परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक कार्यालयामध्ये नांदेड पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 61.14 गुण मिळवून सर्वोत्तम कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकाविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक कार्यालयाला 100 दिवसांचा कृती आराखड्यानुसार कार्यालयीन सुधारणा करण्याबाबत निर्देश दिले होते.
या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांचा भारतीय गुणवत्ता परिषद कॉलीटी कॉन्सिल ऑफ इंडिया यांच्यामार्फत या मोहिमेचे मुल्यमापन करण्यात आले आहे. यामध्ये संकेतस्थळ अद्ययावत, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोयी-सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, ई-ऑफिस प्रणाली, आर्थिक व औद्यागिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी आणि कृत्रीम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, नाविन्यपूर्ण उपक्रम या निकषाच्या आधारे पहिल्या टप्प्याचा निकाल काल १ मे रोजी जाहिर झाला.