आशाताई बच्छाव
कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
पिंपळे गुरव : ब्युरो चीफ उमेश पाटील ता. (१)
माकण चौक, सांगवी येथे १ मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून कामगारांच्या हक्क, सुरक्षितता आणि योगदानाचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामगार कल्याणातील ऐतिहासिक योगदानाची माहिती दिली. त्यांनी केलेल्या सुधारांमध्ये – कामाचे तास ८ करणे, पीएफ योजना, वेतन आयोग, पेन्शन योजना, महिलांना भरपगारी प्रसूती रजा, आठवडी सुट्टी, आणि ESIC योजना आदींचा समावेश आहे.
आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. महिला कामगारांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी ओमसाई फाउंडेशनचे संजय मराठे, सांगवी काळेवाडी मंडळ उपाध्यक्ष ललित म्हसेकर, उद्योजक शैलेस थोरात, राजू गवंडी, शरद पवार, रोहित राऊत, लखन काते, राम मगर, दत्ता आंधळे, भिमराव लोणके आदी मान्यवर उपस्थित होते. कामगार वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला.