आशाताई बच्छाव
उरळ पोलीस स्टेशनची दयनीय अवस्था; पोलीस क्वार्टर्सही मोडकळीस
अकोला प्रतिनिधी आशिष वानखेडे
उरळ पोलीस स्टेशनची स्थिती अत्यंत दयनीय असून, येथे पोलिसांसाठी आवश्यक त्या मुलभूत सुविधाच उपलब्ध नाहीत. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, विश्रांतीसाठी जागा या प्राथमिक गरजांकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे. शिवाय, पोलिसांच्या क्वार्टर्सची अवस्था तर भंगारासारखी झालेली असून, दुरुस्तीचे नावही नाही.
उरळ पोलीस स्टेशनमध्ये मूलभूत सुविधा नसल्याने पोलीस कर्मचारी त्रस्त आहेत. स्टेशनमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, बसण्याची व्यवस्था यांसारख्या आवश्यक सुविधांचा अभाव आहे. शिवाय, पोलिसांच्या क्वार्टर्स देखील दुरुस्तीअभावी मोडकळीस आलेल्या स्थितीत आहेत.
हे सर्व असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते असतानाही अशी स्थिती असणे लाजिरवाणे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर नागरिक आणि पोलीस कर्मचारी तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा दिला जात आहे.






