आशाताई बच्छाव
अवैध वाळू उपसा करणारे 5 हायवासह 5 आरोपी जेरबंद
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की मा.अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपणी सर यांचे मार्गदर्शनाखाली भोकरदन डिवीज़न मधे PSI भागवत कदम,पोलीस अंमलदार प्रताप सुंदरडे,निखिल गायकवाड,विशाल सोळुंखे,यश देशमुख,शिवा कांबळे, यांनी केली. सदरचे कारवाई मधे पोलीस ठाणे हसनाबाद येथे 3 वाळूने भरलेल्या हायवासह अवैध वाळू उपसा करणारे 3 आरोपी सह ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच पोलीस ठाणे टेंभुर्णी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 2 हायवा व 2 आरोपी असा एकूण सह एकूण 94 लाख 64,000/- हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . सर्व आरोपी विरुद्ध वेगवेगळे 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.