आशाताई बच्छाव
माहोरा येथे आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन – सरपंच गजानन लहाने
जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
आज दिनांक 28/04/2025 रोजी सरपंच श्री गजानन भगवानराव लहाने यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत कार्यालय माहोरा येथे आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी उपसरपंच श्री बाबासाहेब दादाराव बोरसे ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सभासद अंगणवाडी ताई आशाताई ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी श्री.आर बी दांडगे संगणक परीचालक श्री. विकास जाधव पत्रकार बांधव व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.यावेळी नागरिकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सेवा हक्कदिनानिमित्त शपथ घेण्यात आली. यावेळी सरपंच श्री गजानन भगवानराव लहाने यांनी उपस्थितितांना मार्गदर्शन केले. माहोरा येथील ग्रामस्थांनी आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा अशी आव्हान केले यावेळी उपस्थित आमचे सर्वांचे आभार मानण्यात आले.