आशाताई बच्छाव
दैनिक माझ्या मराठवाडा वर्धापन दिन अंकाचे भंडारा जिल्ह्यात लोकार्पण
संजीव भांबोरे
भंडारा- आज दिनांक 29 मे 2025 ला दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे लोकार्पण भंडारा जिल्ह्यात करण्यात आले .दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राला तीन वर्ष पूर्ण झाली असून चौथ्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त दैनिक माझा मराठवाडा चे विदर्भ विभागीय संपादक संजीव भांबोरे यांनी जिल्ह्यातील विविध मान्यवरांना प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना दैनिक माझा
मराठवाडा लोकार्पण दिनाचा अंक भेट देण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातखेडे भंडारा, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे , प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे , राष्ट्रीय युवा प्रबोधनकार भावेश कोटांगले ,एशियन न्यूज चॅनलचे मुख्य संपादक डी जी रंगारी ,प्राध्यापक राहुल डोंगरे तुमसर, साकोली येथील बसस्थानक प्रमुख सचिन आगरकर , ओएस कम्प्युटरचे संचालक संजय वंजारी, ठाणेदार महादेव आचरेकर साकोली, जिल्हा पोलीस कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घुमरे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हा प्रभारी डॉ.अक्षय कहालकर, प्रकल्पग्रस्त अशासकीय समितीचे सदस्य भाऊ कातोरे , माजी कार्यकर्ते धनंजय मुलकलवार अड्याळ, मनीषा भांडारकर सामाजिक कार्यकर्त्या भंडाराअंक देण्यात आले.