आशाताई बच्छाव
भाजप महाराष्ट्र संघटन पर्व गाव वस्ती संपर्क अभियान आढावा बैठक — आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची उपस्थिती
नागपूर सुरज गुंडमवार ब्युरो चीफ| सोमवार, 28 एप्रिल 2025
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातर्फे आयोजित संघटन पर्व गाव वस्ती संपर्क अभियानाच्या आढावा बैठकीत दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी राजवाडा पॅलेस, महल, नागपूर येथे कार्यकर्त्यांमध्ये नवा जोम निर्माण करणारे मार्गदर्शन झाले. या बैठकीला आमदार डॉ. मिलिंद नरोटे उपस्थिती होते.
बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक भाजप कार्यकारी प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, आगामी काळात संघटनेची अधिक बळकटी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संघटनात्मक सदस्यता वाढवणे, प्राथमिक व सक्रिय सदस्य नोंदणी पूर्ण करणे, तसेच आगामी जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेसाठी योग्य तयारी करणे या बाबींवर विशेष भर देण्यात आला.
पूर्व विदर्भातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते. कार्यकर्त्यांना उदाहरण देत संघटनेतील सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण कार्याची महत्त्वता विशद करण्यात आली.
बैठकीत मे महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्व सदस्य नोंदणी आणि जिल्हानिहाय समिती रचना पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.