आशाताई बच्छाव
BREAKING! ‘झाडांवर चालतेय बिनधास्त कुऱ्हाड!’ लाकूडतोड्या पुष्पांची 2 वाहने वनविभागाने पकडली ! – लाकडांनी खचाखच भरली होती वाहने !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:– जळगाव जामोद पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना आणि शासनाने यंत्रणेला जंगलांसाठी रक्षणार्थ ठेवले असताना, बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड वृक्षतोड होत आहे. लाकूडतोड करणाऱ्या पुष्पांना वनविभाग काहीसा अपयशी असला तरी, 5 एप्रिल रोजी वनविभागाने अवैध लाकडाने भरलेली दोन वाहने जप्तीची कारवाई केली आहे.
बुलढाणा जिल्हा जंगलव्याप्त आहे. जिल्ह्यात अनेक औषधीयुक्त व महत्त्वाची झाडे आहेत. मात्र या झाडांवर छुप्या मार्गाने कुऱ्हाड चालविली जात असून मोठ्या प्रमाणात लाकडांची तस्करी होत आहे. याकडे वनविभाग दुर्लक्षित असून नाममात्र कारवाई केली जाते हा नेहमीचा अनुभव आहे. या संदर्भात ‘युवा मराठा ‘ने वेळप्रसंगी वृत्त प्रसारित करून आवाज बुलंद केला होता हे विशेष! आज मात्र 5 एप्रिलला जळगाव जामोद वन परीक्षेत्रात अवैध लाकडाने भरलेली दोन वाहने वनविभागाने ताब्यात घेतली आहे. वनविभागाची पुढील कारवाई सुरू असून, वन विभागापुढे होणारी लाकूड तस्करी थांबविण्याचे आव्हान आहे.