
आशाताई बच्छाव
अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी –आदर्श विद्या मंदिर सोनई च्या विद्यार्थ्यांना ‘छावा’ हा ऐतिहासिक चित्रपट दाखवून निरोप समारंभ साजरा. येथील आदर्श विद्या मंदिर सोनई प्राथमिक विभागातील शाळेतील इयत्ता 4 थी च्या विद्यार्थ्यांना छावा चित्रपट दाखऊन निरोप देण्यात आला या समारंभानिमित्त छावा हा ऐतिहासिक चित्रपट वजारवाडी येथील कल्यानम लॉन या ठिकाणी दाखवण्यात आला. मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या बद्दलचा इतिहास समजावून घेत चित्रपटाचा आनंद घेतला. त्याचबरोबर आदर्श विद्या मंदिर सोनई प्राथमिक शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीम बारहाते मॅडम यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री खेसमाळसकर सर होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मुख्याध्यापक श्री दरंदले अनिल सर, प्रशांत गडाख सर, अभिजित दरंदले आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका व विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम काळे मॅडम यांनी केले तर आभार श्रीम कदम मॅडम यांनी मानले आदर्श विद्यामंदिर प्रार्थमिक विभागात नवनवीन कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात इतिहासा बद्दल छोट्या मुलांना माहीती व्हावी हा या मागील उद्देश होता हनुमान ग्रामीण विकास संशोधन मंडळ पानसवाडी सचिव रवी दादा गडाख यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता