
आशाताई बच्छाव
मुजोर ग्रामविकास अधिकारी सवडतकर यांची बदली करा असोला बु ग्रामपंचायत सात सदस्यांची तक्रार.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-चिखली तालुक्यातील मौजे असोल बु येथे नऊ जणांची ग्रामपंचायत सदस्य यांची बॉडी आहे त्यापैकी सात जणांनी असोला बुद्रुक येथील ग्राम विकास अधिकारी सवडतकर यांची बदली करण्याची तक्रार गटविकास अधिकारी पंचायत समिती चिखली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे एका मेल द्वारे तक्रार दाखल केली आहे की ग्रामविकास अधिकारी सवडतकर हे असोला बु येथे वेळेवर येत नाहीत त्यांना वारंवार विकास कामाचे बाबत सांगून सुद्धा ते वेळेवर काम करत नाही गावातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची त्यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांनी अद्याप पर्यंत गावांमध्ये सांडपाण्याची व्यवस्था केली नाही याच गावामध्ये काही दिवसांपूर्वी डेंगू च्या साथीने थैमान घातले होते आणि त्यामध्ये गावातील दोन जणांचा मृत्यू सुद्धा झाला होता एवढे होऊन सुद्धा ग्राम विकास अधिकारी यांना या गोष्टीचे सोयर सुतुक नाही आणखी साथीची वाट पाहत आहेत की काय आसे वातावरण निर्माण झाले आहे तसेच गावातील पाणीपट्टी आणि घरपट्टी साठी ग्रामविकास अधिकारी हे कोणतेही ठोस प्रयत्न करत नाहीत तसेच जी घरपट्टी वसूल झाली आहे ती त्यांनी कोणत्याच खात्यामध्ये भरले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे शासनाच्या येणाऱ्या योजना ह्या लोकांपर्यंत तसेच मासिक सभेमध्ये याची माहिती देत नसल्याचे सुद्धा तक्रारी मध्ये नमूद करण्यातनसल्याच सुद्धा तक्रारा मध्य नमूद करण्यात
आले आहे वेळोवेळी सांगून सुद्धा ग्रामसभा घेत नाही ग्राम स्वच्छता अभियान दर महिन्याच्या 12 किंवा 13 तारखेस राबविण्याचे सर्वानुमते ठराव घेऊन सुद्धा ते वेळेवर हजर राहत नाहीत ग्रामपंचायत कार्यालय मध्ये दोन-तीन दिवसानंतर येतात आणि धातुर्मातुर काम करून चालले जातात तसेच कुणाला दाखला द्यायचा असेल तर त्या दाखला देणाऱ्याकडून पैसे घेत असल्याचे सुद्धा तक्रारी मध्ये नमूद केले आहे कोणाला जर ग्रामपंचायत मधून दाखला घ्यायचा असेल तर त्याचे वेगळे 400 ते 500 रुपये ग्रामविकास अधिकारी घेत असल्याचे सुद्धा तक्रारीमध्ये नमूद केले आहे ग्रामविकास अधिकारी सवडतकर हे सात वर्षापासून असोल बु येथे ग्रामपंचायत मध्ये आहे त्यांचे बदली करण्याची सुद्धा तक्रारीमध्ये मागणी सुद्धा करण्यात आले आहे सदर निवेदनावर सात ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह्या आहेत शोभा गजानन गवई मनीषा आकाश कुमार राठोड रिजवान परविण कडू खान जयश्री सचिन चव्हाण अनिल रूपा चव्हाण शरद अशोक गोलांडे साहेबराव पांडुरंग पवार उपसरपंच असोला बु यांच्या सदर निवेदनावर सह्या आहेत तरी माननीय गटविकास अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे असोल बु यांचे लक्ष लागून आहे सदर निवेदनाच्या प्रती ह्या ग्रामविकास मंत्री मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे सुद्धा पाठवण्यात आले आहे