Home वाशिम अपंगत्वावर मात करत प्रविण महाजन यांचा बॉडीबिल्डींग स्पर्धेत भारतातून दुसरा क्रमांक हजारोंसाठी...

अपंगत्वावर मात करत प्रविण महाजन यांचा बॉडीबिल्डींग स्पर्धेत भारतातून दुसरा क्रमांक हजारोंसाठी ठरले प्रेरणास्त्रोत : दक्षता फिटनेस क्लबच्या वतीने गौरव

129
0

आशाताई बच्छाव

1001361394.jpg

अपंगत्वावर मात करत प्रविण महाजन यांचा बॉडीबिल्डींग स्पर्धेत भारतातून दुसरा क्रमांक
हजारोंसाठी ठरले प्रेरणास्त्रोत : दक्षता फिटनेस क्लबच्या वतीने गौरव
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ: अपंगत्व ही मर्यादा नाही, तर ती संधी असल्याचे सिद्ध करत वाशिम शहरातील प्रवीण मुकेशकुमार महाजन यांनी बॉडी-बिल्डिंग क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुराळा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले महाजन सर यांनी शिर्डी येथे झालेल्या इंडियन बॉडी-बिल्डिंग अ‍ॅण्ड फिटनेस फेडरेशनच्या राष्ट्रीय बॉडीबिल्डींग स्पर्धेत संपुर्ण भारतातून द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदक मिळवले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दक्षता फिटनेस क्लबच्या वतीने गुरुवार, २७ मार्च त्यांचा सत्कार करण्यात आला.
ही प्रतिष्ठित स्पर्धा २५ मार्च रोजी शिर्डी येथे पार पडली. यंदा या स्पर्धेचे ६२ वे वर्ष होते. पोलिओमुळे ४७ टक्के अपंगत्व असूनही ४३ वर्षांच्या वयातही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर बॉडी-बिल्डिंगचा छंद जोपासत महाजन यांनी हे यश मिळवले आहे. कठीण परिस्थितीवर मात करत प्रवीण महाजन यांनी मिळवलेले यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या प्रवासात आंतरराष्ट्रीय खेळाडू व वाशिम पोलीस प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यांच्या संघर्षमय प्रवासाने नवोदित खेळाडूंना नवी ऊर्जा दिली असून, अपंगत्वावर मात करून स्वप्नं साकारली जाऊ शकतात, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

Previous articleमालीश करून न दिल्याने दुकानदारावर वार;आरोपी ताब्यात
Next articleधर्म संस्कृतीची झोपासना करणे काळजी गरज- माजी आमदार नामदेवराव उसेंडी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here