
आशाताई बच्छाव
🎯 सकाळच्या घडामोडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष, देवेंद्र फडणवीसांची घोषणा पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही, छत्रपती संभाजीराजेंचा दावा
सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडी मृत्यूप्रकरणाचा तपास CID कडे, कुटुंबीयांची न्यायासाठी हायकोर्टात याचिका
महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा, मंत्र्यांनाही इलेक्ट्रिक कार वापरावी लागणार
संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडच्या विशेष मकोका कोर्टात सुनावणी संपली, खटला आरोपनिश्चितीसाठी तयार असल्याचा उज्ज्वल निकमांचा दावा, कागदपत्रांशिवाय आरोपनिश्चितीला बचाव पक्षाची हरकत
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या घराची रंगरंगोटी करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, राम कदमांचा उद्धव ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
स्टँड अप कॉमेडियन कुणाला कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव, चौकशीला गैरहजर राहणाऱ्या कामराला खार पोलिसांनी पुन्हा बजावलं समन्स
महाराष्ट्रातील 200 पैकी 186 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त, 843.85 लाख टन उसाचे झाले गाळप
सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार