
आशाताई बच्छाव
शब्दांच्या पलिकडील बातमी पत्रकारांनी शोधली पाहिजे….. आयुक्त डॉ.सुनिल लहाने
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४३ वा विचारमंथन मेळावा संपन्न
सेवाव्रती गिरधारीलाल सारडा,ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर चौबे व प्रा.मोहन खडसे यांना जीवनगौरव पुरस्कार,आयुक्त लहाने सन्मानित
महापुरूषांना अभिवाद,विविध क्षेत्रातील बळींना श्रध्दांजली
अकोला,सतिश लाहुळकर ब्युरो चीफ-– बातमी ही फक्त समोर दिसते त्यातून किंवा केवळ अभिव्यक्तीमध्येच नसते,तर बोलणारांच्या वापरलेल्या शब्दांच्या पलिकडे सुध्दा खरी बातमी दडलेली असते.त्या वास्तवतेचा पत्रकारांनी मनन,चिंतनातून शोध घेऊन बातम्या शोधण्याचं काम केलं पाहिजे.असे प्रतिपादन अकोला महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४३ वा मासिक विचारमंथन मेळावा नुकताच स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे संपन्न झाला.त्याप्रसंगी ते अध्यक्षिय मनोगतातून बोलत होते.अकोला शहराच्या विकासासासाठी नागरीकांनी सर्वोतोपरी सहकार्य देण्याचे आवाहन करून त्यांनी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या पत्रकार आणि सामाजिक कल्याणाच्या वाटचालीला शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी वाशिम येथील सेवाव्रती उद्योजक गिरधारीलाल सारडा हे प्रमुख अतिथी म्हणून तर ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर चौबे,प्रा.मोहन खडसे, पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, उपाध्यक्ष प्रदिप खाडे व मराठवाडा संघटक देवानंद वाकळे यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगे बाबा यांना वंदन अभिवादन करण्यात आले.तर गिरधारीलालजी सारडा यांना “सामाजिक जीवन गौरव” तर ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर चौबे व प्रा.मोहन खडसे यांना
“लोकस्वातंत्र्य पत्रकारिता जीवन गौरव” या राज्यस्तरिय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्रशासकीय सेवा गौरव म्हणून डॉ.सुनिल लहाने यांचाही स्मृतीचिन्ह,ग्रामगीता,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. अमरावती, अकोला व परभणी येथील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे व आय कार्ड वितरीत करण्यात आली.संघटनेसाठी प्रभावी कार्य करणाऱ्या ठीकठीकाणच्या काही पदाधिकाऱ्यांना सुध्दा प्रोत्साहनपर स्मृती चिन्हांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी संजय देशमुख यांनी प्रास्ताविकातून संघटनेची वाटचाल विषद करून भेदभावाला फाटा देऊन सर्व पत्रकारांना आणि समाजसेवींना संघटीत होण्याचे आवाहन केले.सर्वांनी कर्तव्यभावनांनी आपल्या भुमिकामध्ये रहावे अशी आवश्यकता प्रा.खडसे यांनी प्रतिपादित केली, तर चौबे यांनी संघटनेला शुभेच्छा व्यक्त केल्या.
प्रा.महादेव उर्फ देवबाबू. लूले यांचे बहारदार संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय सचिव राजेन्द्र देशमुख, प्रा.डॉ.संतोष हुशे,सिध्देश्वर देशमुख,पुष्पराज गावंडे,अॕड नितीन धुत,अंबादास तल्हार, डॉ.विनय दांदळे,सुरेश पाचकवडे, सौ.जया भारती, प्रा.विजय काटे, आकाश देशमुख( वाशिम) पंजाबराव वर,सतिश देशमुख (विश्व प्रभात),पांडूरंग आगळे,सुरेश भारती,नितीन लोडम,जगन्नाथ गव्हाळे, मनोहर मोहोड,दिलीप नवले, विदर्भ संघटक रावसाहेब देशमुख,अमरावती जिल्हाध्यक्ष संजय देशमुख,गजानन जिरापूरे (अमरावती) आशिष वानखेडे पाटील, अनंतराव देशमुख, शामराव देशमुख, विजयराव बाहकर,वसंतराव देशमुख, प्रा.सुरेश कुलकर्णी,उदय गर्जे,जगन्नाथ गव्हाळे,श्रावण मास्कर,अजय वानखडे,सुरेश तिडके,अनंत महल्ले, रघुनाथ गावंडे,अर्जून घुगे,दिपक सिरसाट, के.एम.देशमुख, संतोष धरमकर,सुधाकर गर्जे, डॉ.अशोक सिरसाट,वसंतराव देशमुख,सौ.सोनल अग्रवाल,सौ.दिपाली बाहेकर, धारेराव देशमुख, शिवचरण डोंगरे,प्रशांत देशमुख,फुलचंद वानखडे,योगेश शिरसाट व अनेक पत्रकार सामाजिक स्नेही उपस्थित होते. आभारप्रदर्शन सौ.जया भारती यांनी केले.स्नेहभोजनाने कार्यक्रमांची सांगता झाली.
==========================