Home जालना राजकीय पक्ष जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक संपन्न

राजकीय पक्ष जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक संपन्न

47
0

आशाताई बच्छाव

1001339238.jpg

 

 

राजकीय पक्ष जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक संपन्न

 

जालना,दि.20 (जिमाका) : मतदार याद्या तयार करणे, त्यांचे पुनरिक्षण व अद्यावतीकरण करण्याच्या अनुषंगाने राजकीय पक्षांशी स्थानिक स्तरावर विचार विनिमय करुन त्यांच्या सुचना घेण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर सर्व मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या प्रतिनिधीसोबत आज दिनांक 19 मार्च, 2025 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात, बैठक संपन्न झाली.

यावेळी बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष ढेंगळे, शिवसेना, (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विधानसभा समन्वयक दिपक गो. रणनवरे, प्रतिनिधी महेश भालेराव, विधानसभा अध्यक्ष, ब.स.पा.करनाडे, जालना जिल्हाध्यक्ष (महिला) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस श्रीमती नंदाताई पवार, प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) सुरेश खंडाळे, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी संजोग हिवाळे, भारतीय  राष्ट्रीय काँग्रेस शहर जिल्हा सरचिटणीस  गणेश चांदोडे, सिध्दीविनायक मुळे यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि. 18 मार्च, 2025 रोजीची विधानसभा मतदार संघ निहाय मतदार संख्येबाबत माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here