आशाताई बच्छाव
वुमन्स इन्सि्परेशनल अवॉर्डने श्रीमती खमर सुलताना सन्मानित
कार्याचा गौरव ; अमृता फडणवीस यांनी केले विशेष कौतुक, नवभारतच्या वतीने मुंबईत गौरव सोहळा
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ : शहरातील बिलियंट एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका आणि ऑक्सपोर्ड इंग्लिश स्कूलच्या संस्थापिका श्रीमती खमर सुलताना यांना शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल नवभारत वृत्तपत्र समूहाच्या नवभारत इन्सि्परेशनल विमेन अवॉर्डने मुंबईत सन्मानित करण्यात अाले. श्रीमती खमर सुलताना यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार सन्मान १९ मार्च २०२५ रोजी मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. यावेळी नवभारत समुहाचे संचालक वैभव माहेश्वरी, ग्रुप प्रेसिडेंट ए.श्रीनिवास उपस्थित होते.
शिक्षण हे वाघिणीची दूध असून, ते पिलेला व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्रिदवाक्य अंिगकारत श्रीमती खमर सुलताना यांनी ५० मुली आणि ५० मुलांना शैक्षणिक दत्तक घेत त्यांच्या आयुष्यात प्रगतीची नवी पहाट आणली आहे. त्यांच्या हातून घडलेल्या अनेक मुली आज विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘नवभारत इन्सि्परेशनल विमेन अवॉर्ड’ या पुरस्काराने बुधवारी मुंबईत सन्मानित करण्यात आले आहे.
चौकट
प्रभावी समुपदेशक आणि प्रेरणादायी वक्त्या
वुशू असोसिएशन ऑफ इंडियन ऑलिम्पिकच्या त्या अध्यक्ष असून, शैक्षणिक आणि सामािजक क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल श्रीमती खमर सुलताना यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.