Home जालना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मंगलताईंना मिळाला आधार…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मंगलताईंना मिळाला आधार…

39
0

आशाताई बच्छाव

1001339192.jpg

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मंगलताईंना मिळाला आधार…

 

जालना, दि. 20 (जिमाका) :-  मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान असलेला जालना जिल्हा. याच जिल्ह्यातील अंबड तालुक्यात चुरमापुरी हे  एक छोटेसे खेडेगाव आहे. चुरमापूरी येथील मंगल रामभाऊ बोडखे ही महिला स्वत:च शेतमजूरी व घरचे काम करत संसाराचा गाडा ओढत असते.  श्रीमती बोडखे यांचे शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झालेले आहे. तसेच पती रामभाऊ बोडखे हे सतत आजारी असल्याने ते गावातच छोटीसी पिठाची गिरणी चालवून आपल्या संसाराला हातभार लावत उदरनिर्वाह करत असतात. त्यांच्या परिवारात त्यांना मुलगा नसून 6 मुलीच आहेत. त्यापैकी 5 मुलींचे लग्न झाले असून त्या त्यांच्या संसारात खुश आहेत. तर सर्वांत लहान मुलगी  ही अविवाहीत असून ती सध्या शिक्षण घेत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यावर दर महिना 1500 रुपये येणार असल्याची बातमी त्यांना भ्रमणध्वनीद्वारे मिळाली. आजूबाजुच्या सुशिक्षीत महिलांकडून त्यांना वारंवार नारी शक्ती ॲपवर अर्ज केला का मावशी अशी विचारणा होवू लागली. त्यांनी नाही म्हणून सांगितले. त्यानंतर त्यांच्या थेट घरीच अंगणवाडी सेविका पोहचल्या त्यांनी मला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी सविस्तर माहिती देवून सर्व कागदपत्रे जमवाजमव करण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत घरी येवून अंगणवाडी सेविकेने त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज यशस्वीरित्या ऑनलाईन भरला. त्यामुळे अर्ज करतेवेळी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही व वेळेत अर्ज दाखल झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. आर्थिक अचडणीच्या काळात पैशांची अत्यंत निकड असतानाच ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत  मंगल रामभाऊ बोडखे यांच्या खात्यावर 3 हजार रुपये जमा झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here