Home जालना रेखा बैजल यांना हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार 50 हजाराचा धनादेश आणि शाल-श्रीफळ...

रेखा बैजल यांना हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार 50 हजाराचा धनादेश आणि शाल-श्रीफळ देवून सन्मान

20
0

आशाताई बच्छाव

1001338327.jpg

रेखा बैजल यांना हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार
50 हजाराचा धनादेश आणि शाल-श्रीफळ देवून सन्मान
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) ः मराठी व हिंदी भाषेत लेखन करणार्‍या  रेखा बैजल यांच्या ‘अज्ञेय’ या हिंदी कादंबरीस महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा ‘जैनेंद्र जैन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकादमीच्या उपाध्यक्षा श्रीमती मंजू लोढा यांच्या हस्ते 50 हजाराचा धनादेश आणि शाल-श्रीफळ देवून सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देत सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई येथील रंगशारदा भवन येथे संपन्न झाला.
यापूर्वी 27 फेब्रुवारीला मुंबई येथील गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात उभारलेल्या भव्य सभा मंडपामध्ये रेखा बैजल यांच्या ‘तुमचा आमचा संजू’ या बालकादंबरीस महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी राज्य पुरस्कार प्रदान केला गेला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व भूतपूर्व संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्याहस्ते 50 हजाराचा धनादेश, शाल व स्मृतिचिन्ह देऊन रेखा बैजल यांना गौरविण्यात आले. महाराष्ट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार हे या प्रसंगी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल रेखा बैजल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here