आशाताई बच्छाव
सोनई, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी: येथील मुळा एज्युकेशन सोसायटी चे मुळा रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,सोनई येथील द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमास शिकत असलेले अल्ताफ सय्यद व श्रीअनंता शिकारे या विद्यार्थ्यांनी सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथे आयोजित राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग कॉम्पेटिशन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. त्याकरिता मुळा शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी खासदार आदरणीय यशवंतराव गडाख पाटील, माजी आमदार शंकरराव गडाख पाटील, मुळा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष उदयन दादा गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ विनायक देशमुख, मुळा रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, सोनई येथील प्राचार्य प्रशांत घुले यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.त्याकरिता प्राध्यापिका गडाख पी के यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.