आशाताई बच्छाव
आग्रीपाडा म्युनिसिपल हायस्कूल विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला स्नेहसंमेलन
मुंबई:( प्रतिनिधी विजय पवार )
मुंबई सेंट्रल येथील आग्रीपाडा म्युनिसिपल हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी तब्बल ३३ वर्षानंतर शिक्षक विद्यार्थी स्नेह संमेलन रविवार दिनांक ०२ मार्च २०२५ रोजी यशस्वीपणे पार पाडला. आणि विशेष म्हणजे ह्या संमेलनासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड परिश्रम घेऊन सर्व मित्र आणि मैत्रिणीनां संपर्क करून त्यांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले. कार्यक्रमासाठी त्यावेळेच्या गुरुवर्य फाटक मॅडम, ढवळे मॅडम, जंगम मॅडम, परांजपे मॅडम, आवाड सर, लहाने मॅडम यांचे पती लहाने सर हे ही आवर्जून उपस्थित राहिले.