
आशाताई बच्छाव
चित्रकार प्रदीप शिंदे यांना महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार प्रदान
नाशिक इम्तियाज अतार प्रतिनिधी
चित्रकार म्हणजे असा कलाकार जो रंग, ब्रश आणि इतर साधनांचा वापर करून पृष्ठभागावर दृश्यमान प्रतिनिधित्व तयार करतो. चित्रकारांनी त्यांच्या कल्पना, भावना आणि निरीक्षणे व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रे, शैली आणि माध्यमांचा वापर केला जातो, परंतु प्रदीप यांनी पिंपळपान सर्जिकल ब्लेड व फॉईल पेपर यांच्या माध्यमातून विविध मनमोहक कलाकृती तसेच मुकुट कलाकृती तयार केल्या आहेत.
विश्वनाथ फाउंडेशन, दैनिक शिवजागर व इन्फोडॅड टेक्नॉलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न कलागौरव व कलारत्न पुरस्कार सिन्नर तालुक्यातील हरसूले व वडगाव पिंगळा येथील चित्रकार प्रदीप भाऊसाहेब शिंदे यांना घोषित करण्यात आला होता
गौरवपदक सन्मानचिन्ह, मानपत्र, मानाचा फेटा या स्वरूपातील हा पुरस्कार छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील येसूबाईंचे पात्र साकारलेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक ओमकार माने, स्मिता राठोड, सुजाता चिंता, संयोजक शंकर चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा सावित्रीबाई फुले स्मारक, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात प्रदीप शिंदे व सहकुटुंब यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
प्रदीप हे नवनिर्मित कलाकृती तयार करत असतात जसे की रेखाचित्रे ब्लड पेंटिंग पिंपळपान कलाकृती मुकुट कलाकृती इत्यादी कला त्यांनी आत्मसात केले आहे विशेष म्हणजे या सर्व कलाकृती कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय प्रदीप तयार करत आले आहेत आणि प्रदीप सांगतात की माणसाला एक तरी छंद नक्की असावा जेणेकरून आपला बहुमूल्य वेळ वाया जाणार नाही आणि याच रिकाम्या वेळेत हाच छंद आपली करमणुकीचे आणि मनोबल वाढविण्याचे साधन बनते व आजचा हा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार ही त्याचीच पावती आहे
महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार, कलारत्न व कला गौरव पुरस्कार विश्वनाथ फाउंडेशन,दैनिक शिवजागर,इन्फोडॅड टेक्नॉलॉजीज प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने चित्रकार प्रदीप शिंदे यांना प्रदान करण्यात आला
यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक ओमकार माने, स्मिता राठोड, सुजाता चिंता, संयोजक शंकर चव्हाण, भाऊसाहेब शिंदे सुमन शिंदे पूजा शिंदे सानवी शिंदे शाहू शिंदे व दत्ता हराळे उपस्थित होते