Home उतर महाराष्ट्र मुळा कारखान्याचा गळीत हंगाम संपला

मुळा कारखान्याचा गळीत हंगाम संपला

48
0

आशाताई बच्छाव

1001283853.jpg

मुळा कारखान्याचा गळीत हंगाम संपला.                   अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 

मुळा सहकारी साखर कारखान्याच्या ४७ व्या गळीत हंगामाचा सांगता कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कारखान्याचे संचालक बाळासाहेब गोरे, विश्वास डेरे तसेच ऊस तोडणी मुकादम रतन मानसिंग चव्हाण यांनी सपत्नीक गव्हाण व ऊसाच्या मोळीची विधीवत पुजा केली. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते गव्हाणीत ऊसाची शेवटची मोळी टाकून गळीत हंगामाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे संचालक बाबुराव चौधरी, लक्ष्मण पांढरे, बापुसाहेब शेटे, बाबासाहेब भणगे, बबन दरंदले, सोपान पंडीत, माजी सभापती रावसाहेच कांगुणे, हभप सुडके, बाळासाहेब सोनवणे, तुकाराम भणगे, तुकाराम बानकर, दत्तात्रय बेल्हेकर, अॅड. गोकुळ भताने, परमानंद जाधव, आदिनाथ रौंदळ, तुकाराम गुंजाळ, दिलीपराव पोटे, कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, जनरल मॅनेजर शंकर दरंदले व अधिकारी वृंद, कारखान्याचे कर्मचारी व ऊस तोडणी यंत्र मालक, ऊस तोडणी व वाहतुक मुकादम व मजुर, ट्रक, ट्रॅक्टर मालक उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्षेत्रातील सर्व
उपलब्ध ऊसाचे गाळप पुर्ण करुन हंगाम यशस्वीपणे चालवल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, वर्क्स मॅनेजर एस.डी.पचार, शेतकी अधिकारी विजय फाटके, चिफ इंजीनिअर डी. बी. नवले, चिफ केमिस्ट एस.डी. देशमुख, डिस्टीलरी मॅनेजर बाळासाहेब दरंदले, को. जन इनचार्ज ए.डी. वाबळे, प्रोडक्शन मैनेजर एस. डी. गाडे यांचा सन्मान करण्यात आला. कारखान्याने या गळीत हंगामात ६ लाख
३९ हजार मे.टन ऊसाचे गाळप केले. ५ लाख ४८ हजार किंटल साखरेचे उत्पादन घेतले, ४ कोटी ५५ लाख बुनिटच्या विज निर्मिती बरोबरच ६१ लाख ९० हजार लिटर इथेनॉल व ८२ लाख लिटर आर. एस. तयार केले. एकुण ८८ दिवस गळीत हंगाम सुरु होता. सांगता प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुराव चौधरी यांनी हंगाम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मदत केल्याबद्दल सर्व सभासद, ऊस उत्पादक व ऊस तोडणी वहातुक यंत्रणेतील सर्व वाहन
मालक व चालक तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानून पुढील हंगामासाठी सर्वांना सुभेच्छा दिल्या. पुढील गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी त्यांचा सर्व ऊस मुळा कारखान्यालाच गळीतासाठी द्यावा असे अवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कारखान्याचे सचिव रितेश टेमक यांनी केले तर मॅनेजर व्ही. के. भोर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

Previous articleशांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे 11 व्या वर्धापन दिन 27 व 28 फरवरी ला भव्य धम्म मेळावा कार्यक्रम संपन्न
Next articleनिफाड येथील चांदोरी तालुक्यात महाशिवरात्री आणि भगवान वीर एकलव्य जयंती साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here