आशाताई बच्छाव
साक्रीच्या टिटाणेत आगळी वेगळी शिवजयंती साजरी “हिंदवी स्वराज्य ध्वज फडकावून केला उत्सव साजरा ” साक्री, संदीप वसंतराव पाटील तालुका प्रतिनिधी:- शिवजयंतीचे औचित्य साधून श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने साक्री तालुक्यातील टिटाने गावात उभारण्यात आलेला हिंदवी स्वराज्य ध्वज फडकवण्यात आला. यावेळी गावातील शिवभक्त,धारकरी बंधु उपस्थित होते.
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने टिटाने तालुका साक्री.जिल्हा . धुळे.गावात मागील अनेक वर्षा पासून छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली जाते. आठवड्यातून एकदा होणाऱ्या या शिववंदनेला गावातील तरुण एकत्रित येतात. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास,दुर्गामाता दौड असे अनेक उपक्रम गावात होत असतात.