आशाताई बच्छाव
अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी –घोडेगाव मध्ये रोहिदास महाराज जयंती उत्साहामध्ये साजरी घोडेगाव येथे 12/02/2025 रोजी रोहिदास महाराज जयंती साजरी झाली त्यानिमित्त या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रवि कदम यांनी केले व अध्यक्षस्थान श्री वयोवृद्ध शिक्षक तुपे गुरुजी यांनी स्वीकारले होते त्यावेळेस तुपे गुरुजींनी महाराजाविषयी थोडक्यात माहिती सांगितली ते पंधरा ते सोळा शतकातील भक्तीचे चळवळ भारतीय गुढ कवी होते.रोहिदास महाराज विषय त्यांनी थोडक्यात सांगितलेत ते अध्यात्मिक शिक्षकही होते व समाज सुधारक ही होते असे गुरुजींनी सांगितले या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित श्री जाधव सर श्री किशोर कदम गोरख कांबळे सुधाकर कुऱ्हाडे शरद कदम काटकर देव्हारे श्री सुधाकर कदम हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सुधाकर कदम यांनी केले