Home जळगाव हिरापूर व रोहिणी येथून गायी, बैल व कोंबड्या चोरी

हिरापूर व रोहिणी येथून गायी, बैल व कोंबड्या चोरी

141

आशाताई बच्छाव

1001207141.jpg

हिरापूर व रोहिणी येथून गायी, बैल व कोंबड्या चोरी

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- हिरापूर ता. चाळीसगाव येथे शेतात पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या 4 गायींसह 9 कोंबड्या चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार दि 4 रोजी सकाळी उघडकीस आला. तसेच रोहीणी शिवारातही एक गाय व एक बैल चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, हिरापूर येथील जितेंद्र भाऊसाहेब पाटील व प्रफुल्ल भाऊसाहेब पाटील यांची एकत्रित शेतजमिन हिरापूर-पिंप्री रस्त्यावर असून शेतात पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या 8 गायी, 5 बकर्‍या व 14 कोंबड्या होत्या. सोमवार दि. 3 रोजी सायंकाळी 6 ते दि 4 रोजी सकाळी 5 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सुमारे 1 लाख 24 हजार रूपयांचे 4 गायी व 9 कोंबड्या चोरून नेल्या आहेत.
तसेच रोहीणी येथील नितीन तुकाराम नागरे यांचा देखील एक बैल व एक गाय चोरीस गेली आहे.
या चोरीप्रकरणी जितेंद्र भाऊसाहेब पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भा.न्या.सं. 2023चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.