आशाताई बच्छाव
1 लाख 33 हजाराच्या इलेक्ट्रीक मोटारी घेऊन दुकानदाराची फसवणूक करणार्या नाशिकच्या एकास केली अटक
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- चाळीसगाव येथील एका दुकानातून सुमारे 1 लाख 33 हजार रूपये किंमतीच्या पाण्याच्या मोटारी विकत घेऊन नाशिक येथील तिघांनी फसवणुक केली होती. चाळीसगाव पोलिसांनी तपास करून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या टोळीने नाशिक, धुळे, मालेगाव परिसरात गुन्हे केल्याची माहिती पोलीसांनी दिली.
चाळीसगाव शहरातील पटेल मशीनरी या दुकानावरुन 20 ते 21 जानेवारी दरम्यान दरम्यान अज्ञात व्यक्तींनी 82 हजार 500 रुपये व नंतर 50 हजार 960 रुपये किंमतीच्या 2 टेक्समो कंपनीच्या 5 हॉर्सपॉवरच्या पाण्याच्या मोटर व 164 सुप्रिम कंपनीचे 3 इंची पाईप असे एकुण 1 लाख 33 हजार 460 रुपयांचा माल घेतला होता
व दुकानदारास दुसऱ्या व्यक्तीचे चेक देवुन चोरीच्या मोबाईल क्रमांकावरुन फोनकरुन फसवणुक केली होती.
याप्रकरणी पटेल मशिनरीच्या मालकाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावर
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोकॉ. सचिन वाघ,शरद पाटील, गौरव पाटील (स्था.गु.शाखा),मिलिंद जाधव (स्था.गु.शाखा) यांनी तपास केल्यावर संशयित योगेश दोधा मोहीते (25) धंदा-किराणा दुकान रा. शिवम नगर चारपाटा नामपुर ता. सटाणा जि. नाशिक, सचिन जगन मोहीते रा. म्हसरुळ ता. जि. नाशिक व समाधान भानुदास चव्हाण रा. सायणे ता. मालेगाव जि. नाशिक यांचा या गुन्हांत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
त्यातील योगेश दोधा मोहीते या आरोपीचा तात्काळ शोध घेवुन त्यास 30 जानेवारी रोजी अटक करुन त्याच्याकडुन गुन्हातील संपुर्ण 1,33,460 रुपये किमंतीच्या 2 टेक्समो कंपनीच्या 5 हॉर्सपॉवरच्या पाण्याच्या मोटर व 164 सुप्रिम कंपनीचे 3 इंची पाईप असा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपींनी नाशिक, मालेगाव धुळे, परीसरात गुन्हे केल्याचे समजले आहे.






