आशाताई बच्छाव
संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूल देगलूर येथे पत्रकार दिन साजरा
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी देगलूर शहरातील संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूल येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात देगलूर चे गटशिक्षणाधिकारी तोटावार सर यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्रासमोर दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यावेळी देगलूर शहरातील व तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव तसेच संपादक व विविध पत्रकार संघटनाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी यांचा पत्रकार दिनानिमित्त संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूल देगलूर चे संस्थापक बोडके सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
त्यानंतर अल्पोपहार कार्यक्रम संपन्न झाला
त्यावेळी संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूलचे संस्थापक बोडके सर यांनी सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानले






