Home पश्चिम महाराष्ट्र कै .दिलीप जोशी यांच्या स्मरणार्थ सावकर चषक,पन्हाळा आयोजित भव्य टेनिस बॉल स्पर्धा

कै .दिलीप जोशी यांच्या स्मरणार्थ सावकर चषक,पन्हाळा आयोजित भव्य टेनिस बॉल स्पर्धा

26
0

आशाताई बच्छाव

1001128248.jpg

कै .दिलीप जोशी यांच्या स्मरणार्थ सावकर चषक,पन्हाळा आयोजित भव्य टेनिस बॉल स्पर्धा

कोल्हापूर. (अविनाश शेलार ब्युरो चीफ) पन्हाळा येथे श्री वारणा बँक लि.प्रायोजक शिवछत्रपती पुरस्कार विजेते कै.दिलीप जोशी यांच्या स्मरणार्थ सावकर चषक,पन्हाळा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे गेले नऊ वर्ष पन्हाळा क्रिकेट क्लब यांच्याकडून आयोजन करण्यात येते.याप्रसंगी अंतिम सामन्यावेळी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थितिती होती
२ जानेवारी २०२५ रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेचा ६ जानेवारी २०२५ रोजी अंतिम सामना पार पडला.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नावजलेले १६ संघ सहभागी झाले होते तर फायनल सामना दख्खन पन्हाळा विरुद्ध राजधानी स्पोर्ट्स यांच्यात पार पडला. यात दख्खन पन्हाळा संघ “सावकर चषक” चा मानकरी ठरला.यामध्ये दख्खन पन्हाळा संघ विजयी झाल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या…
खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी युवकांनी काही वेळ खेळण्याकरिता दिला पाहिजे.ग्रामीण भागांमध्ये क्रिकेट खेळाप्रती प्रचंड आवड दिसते तसेच खेळाच्या माध्यमातून सर्वच खेळाडूंनी करिअरचा मार्ग शोधावा असे आव्हान आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केले…

यावेळी पन्हाळा माजी नगराध्यक्ष विजय पाटील,माजी उपनगराध्यक्ष रविंद्र धडेल,चैतन्य भोसले,जीवन पाटील,पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चैतन्यकुमार माळी,फक्रुद्दीन मुजावर,सचिन पाटील,हर्षद बच्चे,शैलेंद्र लाड,बाळासाहेब भोसले,मोहसीन मुल्ला,सागर गोसावी,रामानंद गोसावी,साहिल पवार,मुनाफ मुजावर,नवाज फरास,अकिब मोकाशी,मोहसिन मुजावर,अक्षय सोरटे,महेश कांबळे,मन्नान फरास,अशपाक गार्दी,केवल कांबळे,संग्राम कांबळे,सचिन गवंडी,विशाल कांबळे,शक्ती सोरटे,मुन्तजर मुजावर तसेच स्पर्धेत भाग घेतलेले सर्व खेळाडू आदी मान्यवर व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Previous article11 जानेवारीला वाशिम मध्ये भव्य मुक मोर्चाचे आयोजन…
Next articleदुःखद बातमी ! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड संजय राठोड यांना पितृशोक !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here