Home नांदेड मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात सामुहिक वाचन संकल्प सजरा

मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात सामुहिक वाचन संकल्प सजरा

99

आशाताई बच्छाव

1001127616.jpg

मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात सामुहिक वाचन संकल्प सजरा

मुखेड युवा मराठा न्यूज नेटवर्क बस्वराज वंटगिरे

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही जी इनामदार हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा डॉ मा म गायकवाड (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) यांनी केले तर आभार ग्रंथपाल डॉ व्ही बी पवार यांनी मानले.
सामूहिक वाचन या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य इनामदार सर म्हणाले की, सरकारने वाचन संस्कृतीची आठवण करून पुन्हा एकदा तरुणाईला पुस्तकाच्या सहवासात जोडण्याचा उपक्रम सुरू करून वाचन संवाद, वाचन, कौशल्य, सामूहिक वाचन,व ग्रंथ परीक्षण यासारखे विविध उपक्रम हाती घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी या उपक्रमात सर्वांनी सहभाग घेऊन वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे नियमितपणे वाचन चालू ठेवणे काळाची गरज आहे. या वेळी मंचावर प्राचार्य मुकुंदराज जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक तथा मुख्य लिपिक श्री संतोष पाटील डॉ के. वाय. पवित्रे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ग्रंथ प्रदर्शननाचे उद्घाटन प्राचार्य इनामदार सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उपक्रमात सहभाग घेऊन एन. एस. एस. चे विद्यार्थी व सेवक बालाजी सादगिरे यांनी परिश्रम घेतले.

Previous articleसोनंईत दिक्षारंभ कार्यक्रम संपन्न
Next articleआपले मानवाधिकार फाउंडेशन तर्फे बसलिंगअप्पा वंटगिरे पत्रकार पुरस्काराने सन्मानित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.