Home उतर महाराष्ट्र सोनंईत दिक्षारंभ कार्यक्रम संपन्न

सोनंईत दिक्षारंभ कार्यक्रम संपन्न

183

आशाताई बच्छाव

1001127579.jpg

अहिल्या नगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी –     मुळा एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनई येथे मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सन्माननीय उदयन दादा गडाख यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयात आज एआईसीटीई अंतर्गत बीबीए आणि बीबीए(सीए) विभागात नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रम आयोजित केला. प्राचार्य डॉ. शंकर लावरे सर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रा.डॉ. सय्यद लियाकत यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने व प्रा.महेश बहीरट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. शंकर लावरे सरांनी महाविद्यालय मध्ये असणाऱ्या सोयी सुविधा तसेच भविष्यकाळातील संधी बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाकरिता विभागातील सर्व शिक्षक उपस्थित होते. विविध मनोरंजक उपक्रमांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous articleबालिकाश्रम परिसरात घरफोडी अहिल्यानगर
Next articleमुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात सामुहिक वाचन संकल्प सजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.