आशाताई बच्छाव
देवळी आश्रम शाळेत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा देवळी येथे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सतिष पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून ऋषिकेश सूर्यवंशी, मुख्याध्यापक तुषार खैरनार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जी.एन. ढगे (से.नि. मुख्याध्यापक) यांनी प्रतिमा पूजन करून दीपप्रज्वलन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती.भाग्यश्री राठोड यांनी केले तर “शालेय जीवन” हे नाटक रोशन पावरा, नीलम पावरा, निधी पावरा, संदीप पावरा, स्नेहल पावरा, पार्वती पावरा, शर्मिला पावरा, साहिल पावरा, अजित पावरा यांनी सादर केले. तसेच कविता पावरा, रत्ना पावरा, अनिल वसावे, बादल बारेला, दीपक पावरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक, अधीक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन पाटील यांनी केले तर आभार श्रीमती. अर्चना मोरे यांनी मानले.






