आशाताई बच्छाव
चाळीसगाव येथे हुतात्मा वीर भाई कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- हुतात्मा वीर भाई कोतवाल यांची पुण्यतिथी दि 2 रोजी साजरी करण्यात आली कॅप्टन कॉर्नर चाळीसगाव येथील विर भाई कोतवाल यांच्या पुतळ्याला आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून वीर भाई कोतवाल यांच्या स्मारकाला अभिवादन केले.
यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी स्व.सदानंदभाऊ चौधरी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
देशासाठी दिलेल्या वीर भाई कोतवाल यांच्या बलिदानाला व संघर्षाला सलाम. स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या पराक्रमाची आठवण प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील. असे आमदार मंगेश चव्हाण म्हणाले.