आशाताई बच्छाव
आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल देगलूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर –फुले शाहू आंबेडकर सेवाभावी संस्था द्वारा संचलित आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल देगलूर येथे भारतातील आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची 193 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फुले शाहू आंबेडकर सेवाभावी संस्थेचे संचालक प्राध्यापक सोनकांबळे मारोती लक्ष्मणराव तसेच सुनंदा मॅडम,सोनाली मॅडम,श्रद्धा मॅडम,प्राची मॅडम अर्पिता मॅडम, अश्विनी मॅडम आदींनी माता सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस पुष्प हार व पुष्प वाहून विनम्र अभिवादन केले. तसेच यावेळी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून ऋषींका पंदनवाड , राधिका गनलेवार, शिवानी गनलेवार , नंदनी कांबळे, अनुष्का सूर्यवंशी आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.तसेच सोहम कुराडे याने भाषण केले.व त्यांच्या कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.
अत्यंत बिकट सामाजिक परिस्थिती असतानाही आपले धैर्य खचू न देता त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले बरोबर खंबीर पणे आपले शैक्षणिक, सामाजिक कार्य निर्भीड पणे केले. ज्यामुळे समाजातील मुले हजारो वर्षांपासून शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकाला मुळ प्रवाहात आणले. यामुळे ते खरे स्त्री, दलित उद्धारक होते. ज्यामुळे आज आपल्या देशात शिक्षिका, अधिकारी ते पंतप्रधान, राष्ट्रपती,आदी सर्वोच्च
पदापर्यंत पोहचल्या आणि महिलांची शक्ती ही पुरुषाबरोबर आहे हे सिद्ध करून दाखविले.याचे सर्व श्रेय महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्रीबाई फुले यांना जाते. संस्थेचे अध्यक्ष मा. सोनकांबळे सरांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली मॅडम व आभार श्रद्धा मॅडम यांनी केले.






