आशाताई बच्छाव
नेवाशातील कत्तलखान्यावर छापा, साडेतेरा लाखांचा मुद्देमाल ताब्यात. अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
नेवासे शहरातील कत्तलखान्यावर छापा घालून अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने १३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याची माहिती घेताना स्थानिक गुन्हे शाखेला शेंडे गल्ली भरावाजवळ काटवनात कत्तलखाना सुरू असल्याची माहिती
मिळाली. त्यानुसार, पथकाने गुरुवारी (२ जानेवारी) त्या ठिकाणी छापा घातला असता, आरोपी नदीम सत्तार चौकरी व इतरांनी गो-वंशाची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांना पाहून आरोर्यांनी पळ काढला. याबाबत केलेल्या चौकशीवरून पोलिसांनी नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटीक, खलील उस्मान चौधरी, अबू शाहाबुद्दीन चौधरी, मोजी अबू
चौचरी, जबी लतीफ चौधरी, अन्सा सत्तार चौधरी व अकील जाफ् चौधरी (सर्व रा. नाईकवाडी मोहल्ल नेवासे खुर्द) यांच्याविरुद्ध गुन्ह दाखल केला आहे. पथका घटनास्थळावरून १३ लाख ४० हजा रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यान घेतला. त्यात १७ गायी, ६ गोवंशीन कालवडी व ४ गोवंशीय गोन्हे यांच समावेश आहे. नेवासे पोलिस ठाण्यान आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यान आला आहे.






