आशाताई बच्छाव
नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी -गुन्हे शाखेचे नेवाशात सुगंधीत तंबाखू विक्रेत्यांवर छापे
नेवासा शहरात मावा व सुगंधीत तंबाखू विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ३ लाख १८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रियाज बाबा शेख, (वय ३२, रा.जुने कोर्ट गल्ली, नेवासा), सुरेंद्रप्रसाद, (रा.नोएडा, दिल्ली (फरार), जावेद फज्जु शेख, (वय २६, रा.जुने कोर्ट गल्ली, नेवासा), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्हात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले. त्यानुसार नेवासा तालुक्यात सुगंधीत मावा, तंबाखू विक्री अवैधरित्या सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ लाख १८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.