
आशाताई बच्छाव
मराठा क्रांती मोर्चा मुंबई , सकल मराठा समाज तर्फे निषेध आंदोलन
मुंबई 🙁 प्रतिनिधी विजय पवार )
बीडमध्ये मराठा समाजाच्या कै. संतोष देशमुख. यांच्या झालेल्या निघृण हत्यांच्या निषेधार्थ सेंटर पॉइंट भारत माता सिनेमा समोर लालबाग येथे. सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा मुंबई. यांच्या तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनात समाजा तर्फे राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना येत्या पंधरा दिवसात सदर हत्या प्रकरणातील दोषी आरोपी यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करून. फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
सदर आंदोलनात मुंबई मधील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.