Home धाराशिव समुद्राळ ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात उपोषण

समुद्राळ ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात उपोषण

479
0

आशाताई बच्छाव

1001079477.jpg

उमरगा, बाळासाहेब माने प्रतिनिधी: तालुक्यातील समुद्राळ या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचा भोंगळ कारभार सुरू असताना नरेंद्र माणिकराव पाटील यांनी पंचायत समिती कार्यालय उमरगा येथे वारंवार तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही. म्हणून आज दि.२४/१२/२०२४ रोजी पंचायत समिती उमरगा येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहेत. सविस्तर बातमी अशी की, समुद्राळ गावातील ग्रामसेवक/सरपंच हे गावातील बसस्थानकाचे अतिक्रमण हटविले जात नाही, जलजिवण मिशन ची खोटी माहिती देणारे ग्रामसेवक/सरपंच यांचेवर कार्यवाही केली जात नाही.दलित वस्तीतील सिमेंट रस्ता बांधकामात अवैध गौण खनिज वापर करणारे ठेकेदार, सरपंच/ग्रामसेवक यांचेवर कार्यवाही केली जात नाही. १ लाख ५२ हजार रूपयाचे खडक न टाकता अपहार केलेला आहे. यापूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाने ग्रामसेवक यांची बदली होत नाही. सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आज पंचायत समिती उमरगा येथे नरेंद्र माणिकराव पाटील हे उपोषणाला बसले आहेत. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here