Home बुलढाणा ब्रेकिंग ! बापरे ! तो विकत होता कामोत्तेजक औषधी ! – मेडिकल...

ब्रेकिंग ! बापरे ! तो विकत होता कामोत्तेजक औषधी ! – मेडिकल मधून विकल्या जात आहेत गर्भपात व नशेच्या गोळ्या! – अन्न औषध प्रशासनाने केला 24.33 लाखाचा औषध साठा जप्त!

70
0

आशाताई बच्छाव

1001069795.jpg

ब्रेकिंग ! बापरे ! तो विकत होता कामोत्तेजक औषधी ! – मेडिकल मधून विकल्या जात आहेत गर्भपात व नशेच्या गोळ्या! – अन्न औषध प्रशासनाने केला 24.33 लाखाचा औषध साठा जप्त!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-लोणार मेडिकलला परवाना मिळाला म्हणजे कोणत्याही औषध-गोळ्या सर्रास
विकाव्या, असा नियम नाही. परंतु लोणार येथील
सुशील पूनमचंद दरोगा यांच्याकडून नमुना 16
पंचनाम्यातर्गत एकूण 24.33 लाखांचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चंदन मेडिकल स्टोअर्स लोणार येथून एकूण 8225 रुपयांची vigorox 100 mg ही कामोत्तेजक औषधी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान मेडिकल मधून गर्भपात करणाऱ्या व नशेच्या गोळ्या विकल्या जात असल्याचे शिक्कामोर्तब होत असून, अन्न औषध प्रशासनाने आज मोठी कारवाई केली.

सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन म. राज्य, बुलढाणा कार्यालयातील औषध निरीक्षक, गजानन प्रल्हाद घिरके यांना लोणार येथे अवैधपणे औषध साठवणूक केल्याची गोपनीय माहीती प्राप्त
निरीक्षक अन्न व औषध प्रशासन म. राज्य वाशिम यांच्या समवेत 19 डिसेंबर रोजी मौजे लोणार येथे चंदन मेडीकोजचे मागे रुम क्रमांक 1, बस स्टँड जवळ, लोणार येथे तपास चौकशी केली असता सदर जागेत विनापरवाना औषधी साठवणूक केल्याचे आढळून आल्याने सुशिल पुनमचंद दरोगा हजर व्यक्ती
यांच्याकडून नमूना 16 व पंचनामा अंतर्गत एकूण 24.33 लक्ष रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सदर औषध नमूना विश्लेषणासाठी घेण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
तसेच चंदन मेडीकल स्टोअर्स, लोणार येथे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here