आशाताई बच्छाव
विद्यार्थ्यांनी जोडली वारकरी सांप्रदायाची नाळ
नेवासे तालुक्यातील श्रीरामवाडीतील सप्ताहात अध्यात्माची गोड
नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी –सोनईजवळील श्रीरामवाडी वस्तीवर पारायण सप्ताहातील जागर, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तनाची गोडी अंगी उतरली. २६ शालेय विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाशी नाळ जोडत गळ्यात तुळशीच्या माळा घातत्या. श्रीरामवाडीतील पारायण सप्ताहात संकल्पपूर्तीचा भाव सार्थकी लागल्याचे बोलले जात आहे.
हनुमान मंदिरात रायभान महाराज बेल्हेकर व वेदांत उपासक गोविंद महाराज निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह संपन्न झाला. या सोहळ्यात सात ते पंधरा वयोगटातील शालेय विद्यार्थी
सहभाग घेतला. बजरंग बाल व युवा मित्र मंडळाने विशेष पुढाकार घेऊन दर शनिवारी केलेली हनुमान चालिसा पठणाच्या माध्यमातून केलेली परमार्थाची पेरणी तुळशीच्या माळा घालण्यास उपयोगी पडली आहे. पारायण सप्ताहास १७ वर्षांची
सोनई येथील पारायण सप्ताहात गळ्यात तुळशीच्या माळा घालणारे विद्यार्थी व संत, महंत.
परंपरा असली, तरी येथील अनेक ज्येष्ठ नागरिक भजन, कीर्तन, मृदंग व टाळकरी म्हणून वारकरी संप्रदायाला जोडून आहेत. येथील गणेश उत्सव, रामनवमी, हनुमान जयंती आदी कार्यक्रमाला नेहमी वारकरी संप्रदायाची जोड असते.
देवगडला सत्कर्म..
२६ शालेय विद्यार्थ्यांनी पारायण साप्ताहात संकल्प केल्यानंतर देवगडला जाऊन महंत भास्करगिरी महाराज यांच्या हाताने तुळशीच्या माळा घातल्या.
पारायण सांगता सोहळ्यात सर्व विद्यार्थ्यांच्या सत्काराचा नामोल्लेख करताच उपस्थित भक्तांनी उपक्रमाचे स्वागत केले.