Home उतर महाराष्ट्र श्रीधर भोसले ख्रिस्ती समाज पुरस्काराने सन्मानित

श्रीधर भोसले ख्रिस्ती समाज पुरस्काराने सन्मानित

25
0

आशाताई बच्छाव

1001056937.jpg

श्रीधर भोसले ख्रिस्ती समाज पुरस्काराने सन्मानित
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी संगमनेरच्या(कोन्ची) स्व. दादाभाऊ भोसले प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीधर भोसले यांनी सामाजिक उपक्रमार्गत संपुर्ण महाराष्ट्रात ख्रिस्ती व इतर अल्पसंख्यांक समाजाचे 151 वधू-वर मेळावे आयोजित करून असंख्य विवाह जुळवून विक्रम केल्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. या कार्याची विशेष दखल घेवुन श्रीरामपूरच्या ब्रदरहुड सोशल सेंटरने श्रीधर भोसले यांना बाभलेश्वरच्या बाळ येशू चर्च मधे ख्रिस्ती समाज भुषण पुरस्कार देवून सन्मानित केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव, सेक्रेटरी पी. एस. निकमसर, फादर मायकल वाघमारे, फादर संजय पंडीत, वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. शैलजा ब्राम्हणे/साबळे, पिटर बारगळसर, साकुरिचे उपसरपंच सचिन बनसोडे, बाळासाहेब ब्राम्हणे, मायकल जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. निमीत्त होते 155 व्या ख्रिस्ती वधू-वर मेलाव्याचे. फादर मायकल यांच्या शुभहस्ते उद्गघाटन झाल्या नंतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक, पुणे, औरंगाबाद इथुन आलेल्यांची 150 हून अधिक उपस्थिती दिसून आली. बाळासाहेब ब्राम्हणे यानी प्रास्ताविक केले तर संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक श्रीधर भोसले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here