आशाताई बच्छाव
युवा मराठा महाब्रेकिंग
सुनिल कोल्हे हल्लाप्रकरणाचे बुुलढाणा कनेक्शन
_इंदीरा नगरमधून करण काटकरला उचचले इतर चार ते पाच आरोपी फरार_
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा, 14 डिसेंबर मोताळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मोताळा तालुकाध्यक्ष सुनिल कोल्हे यांच्यावर 25 नोव्हेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी करण शाम काटकर याला ताब्यात घेण्यात आले आहे. काटकर हा बुलढाण्यातील इंदीरा नगरमधील रहिवासी असल्याने कोल्हे यांच्यावरील हल्ल्याचे बुलढाणा कनेक्शन उघड झाले आहे. आरोपी करणने कोल्हे यांना मारहाण केल्याचे कबूल केले असून याच्यामागे ‘मास्टर माईंड’ कोण, याचा शोध घेण्यासाठी पोलिस आज न्यायालयात पोलिस कोठडीची मागणी करणार असल्याचे कळते.
सुनिल कोल्हे 25 नोव्हेंबर रोजी शेतातून घरी जात असतांना तालखेड फाटयावर अज्ञात पाच जणांनी त्यांना मारहाण केली होती. त्यांना यामध्ये गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी बोराखेडी पोलिस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी खा.सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, आ.रोहित पवार यांनी गंभीर दखल घेतली होती. पोलिसांनी आज करण शाम काटकर याला ताब्यात घेतले आहे. त्याने त्याच्या सोशल मिडीया आकाऊंटवर पिस्तूल हातात घेत फोटो सुध्दा व्हायरल केले आहे. पंरतू ते पिस्तूल ओरीजनल आहे की खेळण्याचे आहे. याबाबत युवा मराठा न्यूज खात्री व्यक्त करीत नाही.
एस.पी. पानसरेंकडून गंभीर दखल
हिवाळी अधिवेशन तोंडावर असतांना सुनिल कोल्हे प्रकरणात एकही आरोपी अटक नसल्याने पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी तपासकामी विविध पथके तैनात केली होती. आरोपींचा कसून शोध सुरु होता. शेवटी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण काटकरला ताब्यात घेण्यात आले. काल, शुक्रवारी रात्री 9 वाजेदरम्यान करण काटकरला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने कोल्हे यांना मारहाण केल्याचे कबूल केले आहे. त्याचे इतर सहकारी मात्र फरार झाले आहेत. त्यांनाही येत्या दोन दिवसांत पकडण्याची योजना पोलिसांनी आखली आहे. कोल्हे यांच्या हल्ल्यामागे वैयक्तीक राग आहे की, राजकीय वाद, याचा तपास सुरु आहे.
करणच्या हातात पिस्तूल घेवून व्हिडीओ
आरोपी करणचे इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अकाऊंट असून त्यात त्याचे हातात पिस्तूल घेवून फोटो आणि व्हिडीओ आहेत. अर्थात ही पिस्तूल असली आहे की नकली ? याची निश्चीत माहिती नाही. पण सदर पिस्तूलला घेऊन आरोपी करणची पोलीस कोठडी वाढू शकते, असे काही पोलीस मित्रांनी युवा मराठा न्यूज ला सांगितले.